-प्रत्येक
स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहावं,आजच्या
काळाची गरज
-उद्योजिकेमध्ये
आत्मविश्वास हवाच
घरातील
स्त्री शिकलेली असेल तर संपूर्ण
घर देखील साक्षर होते, असे नेहमी म्हटले
जाते. महिला कर्तृत्वानं असतात पण त्यांना अनेकदा
संधी मिळत नाही, ती
मिळाल्यास त्या आर्थिकदृष्टया सक्षम
होतील. माणसांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या राहतील.
त्यांनी ठरविले तर त्या उत्तम
गृहिणी सोबतच उद्योजिका देखील होऊ शकतात. यासाठी
स्त्रीने स्वतः वर आत्मविश्वास आणि
हिंमत ठेवणे आवश्यक आहे.
याचेच
एक उदाहरण म्हणजे नागपुरातील उद्योजिका छाया चांडक. त्यांनी
भोपाळ येथील प्रतिष्ठित महाविद्यालयातून स्थापित्या अभियंतेची पदवी घेतली, तसेच
आयसीडब्लूएचे शिक्षण देखील घेतले. नोकरी-व्यवसाय करण्याची त्यांची दृढ इच्छा होती.
लग्न झाल्यावर त्यांनी नवऱ्यासोबत मिळून कौटुंबिक उद्योग समोर नेण्याचे ठरविले.
उद्योग करून इतरांना देखील
नोकरीच्या संधी उपलब्ध करून
द्देण्याचा त्यांचा हेतू होता.
'नागपूर टेक्नो मार्केटिंग' या नावाने असलेली त्यांच्या कंपनीची सुरुवात 1995 साली झाली. उद्योगाला लागणारे साहित्य जसे टूल्स, लुब्रिकेंट्स ,इलेकट्रोड्स, यांचे वितरण त्यांची कंपनी करते. विदर्भ, महाराष्ट्र आणि आणखी काही राज्यात त्यांनी कंपनी सेवा पुरवते. छाया चांडक यांनी जेव्हा त्यांच्या उद्योगात सामील झाल्या तेव्हा त्यांचे काहीच औद्योगिक पार्श्वभूमी नव्हती. शिक्षणाचे महत्व, उद्योग करण्याची आकांक्षा आणि परिश्रम घेण्याची तयारी त्यांची होती. उद्योग सांभाळून घराची जबाबदारी देखील अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली. त्यांच्या मुलगा आयपीएस आहे. त्याने खेळातही नाव कमावले आहे . या सगळ्यात त्याचा आईचा मोलाचा वाटा आहे.
"शिक्षण
हे प्रत्येक महिलेने घ्यायलाच हवे ,आपल्या आवडीचे
क्षेत्र निवडून पायवर उभा राहायला हवे.
पतीला समानतेने परिवाराला चालविण्यात मदत करायला हवी.
घरातील महिला काम करणारी असेल
तर मुल देखील लवकर
जबाबदार होतात. घरात सकारात्मक विचार
चालतात. मला देखील परिवार
आणि उद्योग दोन्ही सांभाळणे थोडे कठीण होते.
पण मेहनतीने दोन्ही छान सध्या झाले",
असे चांडक म्हणाल्या.
त्यांनी कोविड काळात अनेक गरजूंना मदत केली. लॉयन्स क्लब ,इंडियन ऑइल ,यांच्यासह मुखाच्यादन, निर्जंतुकीकरणचे वितरण केले. या संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन अश्यांना त्यांच्याच कंपनीत काम देण्याचे प्रमुख काम केले. याच काळात झूम मीटिंगद्वारे परिवाराच्या लोकांना मुख्यतः महिलांना उद्योग करायला प्रोत्साहित केले.महिलांनी आत्मनिर्भर बनायला हवे, जे काम जमत ते आवडीने करायला हवे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो.
शब्दांकन-
रेणुका किन्हेकर

No comments:
Post a Comment