8 मार्च महिला दिवस जवळ येत असल्याने काहीतरी उत्साह देणारा लेख लिहीण्याचा विचार करत होती.त्याकरिता कष्ट करून यशस्वी झालेल्या महिलांचे काही फोटो मोबाईल गॅलरीत सेव्ह होते. खाली दाखवलेला फोटो देखील होता. फोटो नीट न्याहाळला आणि विचार पडला की आज आपण 21 शतकात असतांना देखील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याच्यात मुलींच्या शिक्षणाचा टक्का अजूनच कमी आहे.
यूनिसेफ नुसार (UNICEF) (यूनिसेफ ही लहान मुलांच्या हक्कांबद्दल काम करणारी संस्था आहे.) देशभरात 132 दशलक्ष मुली शाळेत जात नाहीत. याचे अनेक कारणं आहेत, जसे गरिबी, लग्न, लिंग असमानता, अनेक शाळेत मुलींना गरजेच्या असणाऱ्या सोयी नसतात, स्वछता नसते, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. असे पहिल्या गेले आहे की दारिद्र्य रेषेत येणारे लोक मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतात, मुलींच्या शिक्षणाला महत्व देत नाहीत.
यूनिसेफ नुसार केवळ 66 टक्के देशांनी प्राथमिक शिक्षणात लिंग समानता प्राप्त केली आहे. माध्यमिक स्तरावर हे अंतर अजूनच वाढलेले आहे. 45 टक्के देशांनी माध्यमिक शिक्षणात तर 25 टक्के उच्च माध्यमिक शिक्षणात लिंग समानता प्राप्त केली आहे.
या फोटोबद्दल बोलायचे झाल्यास मला फोटो एडिटरचे कौतुक वाटले. किती सुंदर कल्पना त्याने या फोटोला एडिट करून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चिमुकलीच्या हाती कचऱ्याचे पोते शोभेसे नाही. त्या स्मितहास्यासह शाळेची बॅग जास्त शोभते. तिचे आयुष्य बदलू शकते.
प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क समानरीत्या मिळायला हवा, मुलींच्या शिक्षणाला मुलांप्रमाणेच अग्रस्थान दिले जावे याकरिता अनेक संस्था कार्य करत आहे. आज मोठ्या शहरांमध्ये अनेक स्त्रियांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते पण गावात अजूनही तिला शिक्षणाकरिता लढा द्यावा लागतो आहे. हे चित्र बदलायला हवे आणि त्याकरिता आपण सगळ्यांनीच स्त्री शिक्षणाला प्रोत्सहन दिले पाहिजे .

No comments:
Post a Comment