महिला व आझादी
महिला या स्वतःच्या योग्यतेने व बुद्धिमत्तेने कोणतीही गगन भरारी घेऊ शकतात हे लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी सिद्ध करून दाखवले . पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्री -पुरुष समानतेच उत्तम उदाहरण म्हणून समोर आलेल्या डॉ . माधुरी कानिटकर भारतातल्या तिसऱ्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल असून भारतीय लष्करातील सगळ्यात महत्वाच पद त्यांनी भूषवलं आहे. त्यांना अति विशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल भारतीय सेनेत मिळाले आहे. ३७ वर्षांचा गौरवशाली काळात त्यांनी भारतीय सेनेत विविध उचांक गाठले आहे. बाळरोग विशेषज्ञ असून त्या लष्करात वैद्यकीय सेवा देत असून ,त्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका देखील होत्या . एकूणच त्यांनी एक डॉक्टर,शिक्षिका आणि फौजी अश्या तीनही आदराजोग्या सेवा पार पाडल्या आहे. आणि या सर्व्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पती माजी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या खान्द्यावरील स्टार्स आणि डोक्यावरील टोपी हीच पाईपिंग सोहळ्याच्या वेळी लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी गर्वाने घातली आणि खांद्याला खांदा दिला . भारतीय लष्करातील हे सगळ्यात महत्वाचं पद एकाच घरात दोघंही नवरा बायकोला मिळणं हि फार सन्मानाची गोष्ट आहे.
लेफ्टनंट जनरल डॉ .माधुरी कानिटकर ह्या त्या प्रत्येक महिलेसाठी उदाहरण आहे, ज्यांना आयुष्यात जिद्दीने व मेहनतीने पुढे जायचं आहे ,काहीतरी बनून दाखवायचा आहे. कोणतंही क्षेत्र अस नाही जिथे महिला काम करू शकत नाही. तिला घरच्यांकडून साथ मिळाली तर ती कोणतंही क्षेत्र व पद अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. ते दोघेही लष्करात असल्याने बदल्या व्हायच्या ,मुलांच्या शिक्षणात अडचणी यायच्या पण दोघांनीही एकमेकांना नीट समजून आयुष्यतील सगळे खडतर प्रसंग पार पाडले .या सगळ्यात कुटुंबाकडे कुठेही दुर्लक्ष न होऊ देता आईची भूमिकाही नीट पार पाडली. प्रत्येक स्त्रीमध्ये स्वप्न आहे जिद्द आहे तिला ते पूर्ण करू द्या. तिला पाठिंबा द्या . असे झाल्यास तिच्यात सर्व जग जिंकायची ताकद आहे.आधीपासून समाजाने स्त्रियांवर पुष्कळ बंधने घातली आहेत ,आजच्या जगात ती कमी जरी झाली असली तरी संपलेली नाहीत. स्त्रियांना त्यांचे शिक्षण ,आवडते क्षेत्र निवडायला परवानगी नसते .आणि तिने स्वतःच्या आवडीने निवडलेले क्षेत्र घेतल्यास पुढे तिला विचारल्या जाते कि ,तुझे लग्न झाल्यावर तू संसार आणि नोकरी हे दोघं कस संभाळशील ?तुझ्या नोकरीत बदल्या होतील मग तुझ्या संसार कसा चालणार ?तुझ्या नवऱ्याला तू उच्चपदी गेली तर चालणार का ?हे मुलींचे क्षेत्र नाही ,मुलांचे आहे . असे अनेक प्रश्न तिला विचारले जातात .म्हणजे तिला लहानपणापासूनच तिच्या होणाऱ्या संसारासाठी काय योग्य आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.हेच प्रश्न मुलांना की नाही विचारल्या जात ?असे प्रश्न कुटुंबांनी आणि समाजाने विचारण सोडायला हव आणि स्त्रीला तिच्या आवडीनुसार शिक्षण ,नोकरी करायची मुभा असल्यास खरी स्त्री -पुरुष समानता होईल.
" हक्क" हा बाई किंवा माणसासाठी नसून मानव जातीकरिता असायला हवा .जर का समाजाने स्त्रीला न डांबता तिच्या पंखांना बळ दिले तर 'महिला सशक्तीकरण' स्त्री-पुरुष समानता 'असे हक्क तिला मागावे लागणार नाही . लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांना दोन बहिणी आहेत पण त्यांनी एका मुलाखतीत बोलतांना सांगितले. ,कि त्यांच्या वडिलांनी कधीही 'मुलांसारखा हो ' असे म्हटले नाही . मुलींना मुलींप्रमाणे वाढविले आणि आता तिघीही बहिणी उच्चपदी आहेत .डॉ माधुरी कानिटकर यांना सैन्याचा पोशाखाचे आकर्षण होते ,लष्करात जाण्याची रुची होती .त्यांनी त्याचें स्वप्न पूर्ण केले.घरचांची साथ व गुणांना वाव मिळाल्यामुळे त्या लष्करातील 'लेफ्टनंट जनरल' हे पद भूषवू शकल्या . त्यांच्या मुलांनी "तुला ३ स्टार लष्करातून मिळाले आणि आम्ही दोघं मुलं पण तुझे स्टार आहोत म्हणजे तू आता तू फाईव्ह स्टार झाली अशी गंमत केली ",त्यांच्या मुलांना देखील त्यांचा फार गौरव आहे. त्या सगळ्यांचे प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने स्त्रीला जर का निर्णय घेण्याची आझादी मिळाली तर ती किती मोठी भरारी घेऊ शकते हे सिद्ध करून दाखविले आहे.
लेखिका :-
रेणुका किन्हेकर

No comments:
Post a Comment