Tuesday, March 2, 2021

World Wildlife Day 2021

 

World Wildlife Day 2021

Theme :-"Forests and Livelihoods: Sustaining People and Planet.”

Earth is home to countless species, and wildlife plays an important role in balancing the environment. World Wildlife Day is celebrated each year on March 3 to raise awareness and discussing the threats that impact wildlife. The day also highlights the issues such as urbanization, pollution, destruction of wildlife habitat, and the ways that humans can contribute to conservation efforts.


world wildlife day 2021


The United Nations General Assembly (UNGA) on December 20,2013, at its 68th session, decided to proclaim March 3, the day of the adoption of the Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora (CITES), as World Wildlife Day. World Wildlife Day has become one of the most important global annual events dedicated to wildlife.

World Wildlife Day 2021 theme is "Forests and Livelihoods: Sustaining People and Planet.”

World Wildlife Day is an opportunity to celebrate the many beautiful and varied forms of fauna and flora and to raise awareness of the various challenges faced by these species. The day also reminds us of the urgent need to step up the fight against wildlife crime, which has wide-ranging economic, environmental, and social impacts.

ती आणि शिक्षणाचा लढा

8 मार्च महिला दिवस जवळ येत असल्याने काहीतरी उत्साह देणारा लेख लिहीण्याचा विचार करत होती.त्याकरिता   कष्ट करून यशस्वी झालेल्या महिलांचे काही फोटो मोबाईल गॅलरीत सेव्ह होते. खाली दाखवलेला फोटो देखील होता. फोटो नीट न्याहाळला आणि विचार पडला की आज आपण 21 शतकात असतांना देखील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याच्यात मुलींच्या शिक्षणाचा टक्का अजूनच कमी आहे.


यूनिसेफ नुसार (UNICEF) (यूनिसेफ ही  लहान मुलांच्या हक्कांबद्दल काम करणारी संस्था आहे.) देशभरात 132 दशलक्ष मुली शाळेत जात नाहीत. याचे अनेक कारणं आहेत, जसे गरिबी, लग्न, लिंग असमानता, अनेक शाळेत मुलींना गरजेच्या असणाऱ्या सोयी नसतात, स्वछता नसते, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. असे पहिल्या गेले आहे की दारिद्र्य रेषेत येणारे लोक मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतात, मुलींच्या शिक्षणाला महत्व देत नाहीत.


यूनिसेफ नुसार केवळ 66 टक्के देशांनी प्राथमिक शिक्षणात लिंग समानता प्राप्त केली आहे. माध्यमिक स्तरावर हे अंतर अजूनच वाढलेले आहे. 45 टक्के देशांनी माध्यमिक शिक्षणात तर 25 टक्के  उच्च माध्यमिक शिक्षणात लिंग समानता प्राप्त केली आहे. 


या फोटोबद्दल बोलायचे झाल्यास मला फोटो एडिटरचे कौतुक वाटले. किती सुंदर कल्पना त्याने या फोटोला एडिट करून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चिमुकलीच्या हाती कचऱ्याचे पोते शोभेसे नाही. त्या स्मितहास्यासह शाळेची बॅग जास्त शोभते. तिचे आयुष्य बदलू शकते. 


प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क समानरीत्या मिळायला हवा, मुलींच्या शिक्षणाला मुलांप्रमाणेच अग्रस्थान दिले जावे याकरिता अनेक संस्था कार्य करत आहे. आज मोठ्या शहरांमध्ये अनेक स्त्रियांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते पण गावात अजूनही तिला शिक्षणाकरिता लढा द्यावा लागतो आहे. हे चित्र बदलायला हवे आणि त्याकरिता आपण सगळ्यांनीच स्त्री शिक्षणाला प्रोत्सहन दिले पाहिजे .  



Saturday, February 20, 2021

5 Things About International Mother Language Day 2021 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2021

१) २१ फेब्रुवारी हा (International Mother Language Day) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो . १७ नोव्हेंबर १९९९ रोजी यूनेस्को (UNESCO) संघटनेने सर्वमताने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (International Mother Language Day) म्हूणन साजरा करण्यात यावा असे सांगितले. याचे मुख्य उद्धेश्य म्हणजे जगातील लोक वापरत असलेल्या सर्व भाषांचे जतन  आणि भाषेच्या संरक्षणास प्रोत्साहित करणे होय. 


International Mother Language Day


२) १९५२ साली बांगलादेशमध्ये बंगाली बोलणारे लोक एकत्र आले, त्या देशात इतरही भाषा बोलल्या जात असल्या तरी बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक होती. बांगलादेशात जेव्हा बंगाली  मातृभाषा असणारे लोक एकत्र आले तेव्हा बंगाली भाषेची जगाला ओळख व्हावी म्हणून २१ फेब्रुवारी १९५२ रोजी बंगाली भाषा मातृभाषा दिन (International Mother Language Day) म्हणून साजरा केला . याचे महत्व  यूनेस्कोने(UNESCO) ओळखले आणि सन १९९९ पासून संपूर्ण जगात मातृभाषा दिन म्हूणन साजरा करण्याची प्रथा सुरु केली .


३)२०२१च्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा विषय (International Mother Language Day Theme), “शिक्षण आणि समाजात समाविष्ट करण्यासाठी बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे” (Fostering multilingualism for inclusion in education and society,”) आहे. यूनेस्कोची (UNESCO) अशी मान्यता आहे की मातृभाषेवर आधारित शिक्षण लहानपणापासूनच दिले गेले पाहिजे, कारण हेच शिक्षणाचा पाया आहे.


४) भारतामध्ये २२अधिकृत भाषा, १६३५ मातृभाषा आणि २३४ ओळखण्यायोग्य मातृभाषा आहेत. भाषेचे महत्व म्हणजे आपली भावना बोलण्यातून दुसऱ्यांपर्यंत पोहचविणे यासोबतच आपल्या संस्कृतीशी जुळून राहणे होय . 


५) जगासोबत चालायचे असेल तर इंग्रजी, हिंदी, परकीय भाषा येणे गरजेचे वाटू लागते. आपल्या भाषेत शिक्षण घेतल्यास त्याचे मह्त्व राहणार नाही ही भीती मनात असते .पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी  शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान मिळण्यास मदत होते. मग ते कोणत्याही भाषेतून असो. जर्मनी, चायना, इटली, फ्रान्स हे  देश आपल्या भाषेला न विसरताच पुढे आले आहेत. युनाइटेड नेशन्सच्या(United Nations) अनुसार प्रत्येक दोन आठवड्यात एका भाषेचा लोप होतो. 


प्रत्येकाला आपली मातृभाषा जवळची वाटते.त्या बद्दल आदर अभिमान असतो. एक भाविनक नाते त्या भाषेसह जुळलेले  असते.  आपण प्रत्येक वेळा हा विचार करायला हवा कि आपली भाषा लोप पावणार नाही आणि ती ज्ञानभाषा कशी बनू शकेल .जागतिकरण होत असताना आपल्या मातृभाषेचे अस्तित्व कसे टिकून राहील याची दक्षता आपण घ्यायला हवी .   

#International Mother Language Day #Mother tongue #languages #India

Tuesday, February 16, 2021

महिलांनो सक्षम व्हा:छाया चांडक

 

https://bit.ly/3miNvye

  

-प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहावं,आजच्या काळाची गरज

-उद्योजिकेमध्ये आत्मविश्वास हवाच

घरातील स्त्री शिकलेली असेल तर संपूर्ण घर देखील साक्षर होते, असे नेहमी म्हटले जाते. महिला कर्तृत्वानं असतात पण त्यांना अनेकदा संधी मिळत नाही, ती मिळाल्यास त्या आर्थिकदृष्टया सक्षम होतील. माणसांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या राहतील. त्यांनी ठरविले तर त्या उत्तम गृहिणी सोबतच उद्योजिका देखील होऊ शकतात. यासाठी स्त्रीने स्वतः वर आत्मविश्वास आणि हिंमत ठेवणे आवश्यक आहे.

 


 


 

याचेच एक उदाहरण म्हणजे नागपुरातील उद्योजिका छाया चांडक. त्यांनी भोपाळ येथील प्रतिष्ठित महाविद्यालयातून स्थापित्या अभियंतेची पदवी घेतली, तसेच आयसीडब्लूएचे शिक्षण देखील घेतले. नोकरी-व्यवसाय करण्याची त्यांची दृढ इच्छा होती. लग्न झाल्यावर त्यांनी नवऱ्यासोबत मिळून कौटुंबिक उद्योग समोर नेण्याचे ठरविले. उद्योग करून इतरांना देखील नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्देण्याचा त्यांचा हेतू होता.

'नागपूर टेक्नो मार्केटिंग' या नावाने असलेली त्यांच्या कंपनीची सुरुवात 1995 साली झाली. उद्योगाला लागणारे साहित्य जसे टूल्स, लुब्रिकेंट्स ,इलेकट्रोड्स, यांचे वितरण त्यांची कंपनी करते. विदर्भ, महाराष्ट्र आणि आणखी काही राज्यात त्यांनी कंपनी सेवा पुरवते. छाया चांडक यांनी जेव्हा त्यांच्या उद्योगात सामील झाल्या तेव्हा त्यांचे काहीच औद्योगिक पार्श्वभूमी नव्हती. शिक्षणाचे महत्व, उद्योग करण्याची आकांक्षा आणि परिश्रम घेण्याची तयारी त्यांची होती. उद्योग सांभाळून घराची जबाबदारी देखील अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली. त्यांच्या मुलगा आयपीएस आहे. त्याने खेळातही नाव कमावले आहे . या सगळ्यात त्याचा आईचा मोलाचा वाटा आहे.

"शिक्षण हे प्रत्येक महिलेने घ्यायलाच हवे ,आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून पायवर उभा राहायला हवे. पतीला समानतेने परिवाराला चालविण्यात मदत करायला हवी. घरातील महिला काम करणारी असेल तर मुल देखील लवकर जबाबदार होतात. घरात सकारात्मक विचार चालतात. मला देखील परिवार आणि उद्योग दोन्ही सांभाळणे थोडे कठीण होते. पण मेहनतीने दोन्ही छान सध्या झाले", असे चांडक म्हणाल्या.

 त्यांनी कोविड काळात अनेक गरजूंना मदत केली. लॉयन्स क्लब ,इंडियन ऑइल ,यांच्यासह मुखाच्यादन, निर्जंतुकीकरणचे वितरण केले. या संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन अश्यांना त्यांच्याच कंपनीत काम देण्याचे प्रमुख काम केले. याच काळात झूम मीटिंगद्वारे परिवाराच्या लोकांना मुख्यतः महिलांना उद्योग करायला प्रोत्साहित केले.महिलांनी आत्मनिर्भर बनायला हवे, जे काम जमत ते आवडीने करायला हवे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो.

 

शब्दांकन- रेणुका किन्हेकर 

Sunday, August 30, 2020

महिला व आझादी

https://www.tarunbharat.net/Encyc/2020/9/2/symbol-of-indomitable-will-and-aspiration-lieutenant-general-dr-madhuri-kanitkar.html 

महिला व  आझादी 

महिला या स्वतःच्या योग्यतेने व बुद्धिमत्तेने कोणतीही गगन भरारी  घेऊ शकतात हे लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी सिद्ध करून दाखवले . पुरुषांचे  वर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्री -पुरुष समानतेच उत्तम उदाहरण म्हणून समोर आलेल्या डॉ . माधुरी कानिटकर  भारतातल्या तिसऱ्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल असून भारतीय लष्करातील सगळ्यात महत्वाच पद  त्यांनी भूषवलं आहे. त्यांना अति विशिष्ट सेवा मेडल  आणि  विशिष्ट सेवा मेडल  भारतीय सेनेत मिळाले आहे. ३७ वर्षांचा  गौरवशाली  काळात त्यांनी  भारतीय सेनेत विविध उचांक गाठले आहे. बाळरोग  विशेषज्ञ असून त्या लष्करात वैद्यकीय सेवा देत असून  ,त्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका देखील होत्या . एकूणच त्यांनी  एक डॉक्टर,शिक्षिका आणि फौजी अश्या तीनही आदराजोग्या  सेवा पार पाडल्या आहे. आणि या सर्व्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पती माजी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या खान्द्यावरील स्टार्स आणि डोक्यावरील टोपी हीच पाईपिंग सोहळ्याच्या वेळी   लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी गर्वाने घातली आणि खांद्याला खांदा दिला . भारतीय लष्करातील हे सगळ्यात महत्वाचं पद एकाच घरात दोघंही नवरा बायकोला मिळणं हि फार सन्मानाची गोष्ट आहे.

                           लेफ्टनंट जनरल डॉ .माधुरी कानिटकर ह्या  त्या प्रत्येक महिलेसाठी उदाहरण आहे, ज्यांना आयुष्यात जिद्दीने व मेहनतीने पुढे जायचं आहे ,काहीतरी बनून दाखवायचा आहे. कोणतंही क्षेत्र अस नाही जिथे महिला काम करू शकत  नाही. तिला घरच्यांकडून साथ मिळाली तर ती कोणतंही क्षेत्र व पद अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. ते दोघेही लष्करात असल्याने बदल्या व्हायच्या ,मुलांच्या शिक्षणात अडचणी यायच्या पण दोघांनीही एकमेकांना नीट समजून आयुष्यतील सगळे खडतर प्रसंग पार पाडले .या सगळ्यात कुटुंबाकडे कुठेही दुर्लक्ष होऊ देता आईची भूमिकाही नीट  पार पाडलीप्रत्येक स्त्रीमध्ये  स्वप्न आहे जिद्द आहे तिला ते पूर्ण  करू द्या. तिला पाठिंबा द्या . असे झाल्यास तिच्यात सर्व जग जिंकायची ताकद आहे.आधीपासून  समाजाने स्त्रियांवर  पुष्कळ बंधने घातली आहेत ,आजच्या जगात ती कमी जरी झाली असली तरी संपलेली नाहीत. स्त्रियांना त्यांचे शिक्षण ,आवडते क्षेत्र निवडायला परवानगी नसते .आणि तिने स्वतःच्या आवडीने निवडलेले क्षेत्र घेतल्यास पुढे तिला विचारल्या जाते कि ,तुझे लग्न झाल्यावर तू संसार आणि नोकरी हे दोघं कस संभाळशील ?तुझ्या नोकरीत बदल्या होतील मग तुझ्या संसार कसा चालणार ?तुझ्या नवऱ्याला तू उच्चपदी गेली तर चालणार का ?हे  मुलींचे क्षेत्र नाही ,मुलांचे आहे . असे अनेक प्रश्न तिला विचारले जातात .म्हणजे तिला लहानपणापासूनच  तिच्या होणाऱ्या संसारासाठी काय योग्य आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.हेच प्रश्न मुलांना की नाही विचारल्या जात ?असे प्रश्न कुटुंबांनी आणि समाजाने विचारण सोडायला हव आणि स्त्रीला तिच्या आवडीनुसार शिक्षण ,नोकरी करायची मुभा असल्यास खरी  स्त्री -पुरुष समानता  होईल.

                                   " हक्क" हा बाई किंवा माणसासाठी नसून मानव जातीकरिता असायला हवा .जर का समाजाने स्त्रीला न डांबता तिच्या पंखांना बळ दिले तर 'महिला सशक्तीकरण' स्त्री-पुरुष समानता 'असे हक्क तिला मागावे लागणार नाही . लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांना दोन बहिणी आहेत पण त्यांनी एका मुलाखतीत बोलतांना सांगितले. ,कि त्यांच्या वडिलांनी कधीही 'मुलांसारखा हो ' असे म्हटले नाही . मुलींना मुलींप्रमाणे वाढविले  आणि आता तिघीही बहिणी उच्चपदी आहेत .डॉ माधुरी कानिटकर यांना सैन्याचा पोशाखाचे आकर्षण होते ,लष्करात जाण्याची रुची होती .त्यांनी त्याचें स्वप्न पूर्ण केले.घरचांची साथ व गुणांना वाव मिळाल्यामुळे त्या लष्करातील  'लेफ्टनंट जनरल' हे पद भूषवू शकल्या . त्यांच्या मुलांनी "तुला ३ स्टार लष्करातून मिळाले आणि आम्ही दोघं मुलं पण तुझे स्टार आहोत म्हणजे तू आता तू फाईव्ह स्टार झाली अशी गंमत केली ",त्यांच्या मुलांना देखील त्यांचा फार गौरव आहे. त्या सगळ्यांचे प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने स्त्रीला जर का निर्णय घेण्याची आझादी  मिळाली तर ती  किती मोठी भरारी घेऊ शकते  हे सिद्ध करून दाखविले आहे.  

लेखिका :-

रेणुका किन्हेकर 

World Wildlife Day 2021

  World Wildlife Day 2021 Theme :-"Forests and Livelihoods: Sustaining People and Planet.” Earth is home to countless species, and wi...